विश्वस्त मंडळाने जिंकली कायदेशीर लढाई
वृत्तसंस्था । इस्लामाबाद
पाकिस्तानच्या दक्षिणेकडील कराची शहरातील एका प्राचीन हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत असून, त्यासाठी निधीही जमविण्यात येत आहे. अनेकवर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अतिक्रमण केलेल्यांना मंदिर परिसरातून हाकलून देण्यात यश आले आहे.
शहरातील सोल्जर बझार परिसरात असणारे श्री पंचमुखी हनुमान मंदिर हे दीड हजार वर्षांपूर्वीचे आहे. या मंदिराच्या नूतनीकरणासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, मोक्याच्या जागी असणारे मंदिर पाहून लँड माफियांनी विश्वस्तांना धमक्या देण्यास सुरुवात केली आणि त्यानंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात निधीची कमतरता भासू लागल्याने कामकाज रखडले आहे.
'मंदिराच्या जीर्णोद्धाराचा दोन वर्षांचा कार्यक्रम हाती घेतला होता. मात्र निधीची कमतरता आणि ही मोक्याची जमीन बळकावू पाहणाऱ्यांनी अतिक्रमणाचा घाट घातला. न्यायालयीन प्रक्रिया पार पडण्यात बराचसा वेळ गेल्याने आमचा पैसा त्यातच खर्च झाला,' अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी श्री रामनाथ महाराज यांनी दिली.
हे मंदिर जगभरातील हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरातील मूर्ती घडविण्यात आली नसून, तिच्या मूळ रूपात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आठ फूट उंचीची निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या दगडात कोरलेली मूर्ती जेथे सापडली तेथेच तिची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामुळे नूतनीकरणाच्या कामात र्मूती ठेवण्यात आलेल्या गाभाऱ्यात बांधकाम करण्यात येणार नसल्याचेही रामनाथ महाराज यांनी नमूद केले. मंदिराचे पूर्वाश्रमीचे रूपडे आहे, तसेच टिकवून ठेवण्यासाठी भिंती उभारण्यासाठी किंचित पिवळ्या रंगाचा दगड वापरण्यात येणार आहे

.jpg)
.jpg)
.jpg)
No comments:
Post a Comment