"व्हॅल्यू' म्हणजे फक्त किंमत नाही, तर मूल्य, मोल व संस्कार यांचे एक वेगळे मिश्रण असते. अर्थात, ही संकल्पना व्यक्तिसापेक्ष असते. प्रत्येक व्यक्तीनुसार आणि पिढीनुसार ती बदलत जाते याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेतलाय...
मध्यंतरी एका कॉलेजमध्ये "व्हॅल्यू इंजिनियरिंग' हा विषय शिकवण्याची संधी मिळाली. त्या वेळी झालेल्या चर्चेतून "व्हॅल्यू' या शब्दाचे विविध पैलू स्पष्ट करावे लागले. "व्हॅल्यू' म्हणजे किंमत नसून, मूल्य, मोल व संस्कार यांचे एक वेगळे मिश्रण असते. गंमत म्हणजे ही संकल्पना व्यक्तिसापेक्ष असते. एकाला अनमोल वाटणारी वस्तू दुसऱ्याला वाटेलच असे नाही. एखादा संस्कार एखाद्या पिढीला महत्त्वाचा वाटला तरी पुढल्या पिढीला वाटेलच असे नाही. प्रत्यक्ष अनुभवलेली काही उदाहरणे म्हणूनच मला लिहाविशी वाटली.
एकदा घरी पाहुणे येणार म्हणून इतर स्वयंपाकाबरोबर घोसाळ्याची भजी करायचे ठरविले. पाहुण्यांत तीन मुलेही होती. आमच्या घरी हा वेल चांगला वाढला होता व बरीच घोसाळी लागली होती. मुले आल्यावर त्यांना आवर्जून हा वेल, त्याची लगडलेली घोसाळी व इतर बाग दाखविली. जेवताना गरम भजी मुलांना वाढली; पण त्यांना ती एवढी आवडली नाहीत. गिळगिळीत लागली. एकेक उष्टावून त्यांनी कुरकुऱ्यांचे पाकीट उघडले. घरची भाजी वगैरेचे त्यांना अप्रूप नव्हते किंवा एखादी नवी चव डेव्हलप करावी, याचीही उत्सुकता नव्हती. "घरगुती' किंवा "घरचे' याचे मोल त्यांना शब्दांत कसे सांगणार?
माझी मुलगी एकदा शाळेतून आल्यावर म्हणाली, ""बाबा, शाळेत ग्रीटिंग कार्डची स्पर्धा आहे. मी विसरले आधी सांगायला; पण उद्याच शेवटचा दिवस आहे. टीचरने नवीन कल्पना वापरून कार्ड करायला सांगितले आहे.'' मी तिच्याशी वेगवेगळ्या कल्पनांची चर्चा करून आपण बागेतल्या वाळलेल्या फुला-पानांचे कार्ड करू असे ठरवले; पण उद्याच्या उद्या पाकळ्या व पाने कशी वाळणार? मग फुले, पाने मायक्रोवेव्हमध्ये ठेवून व दोन-चार प्रयत्नांनी आम्हाला छान मटेरियल मिळाले. कार्डावर चिकटवून झाड, फुले झोपडी असे वाळलेल्या फुला-पानांचे छानसे कार्ड तयार झाले. दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर ती नाराज होऊन घरी आली. म्हणाली, ""बाबा, आपले ग्रीटिंग अगदी साधे दिसत होते. पहिल्या आलेल्या दोन मुलांनी महागडे स्पार्कल कलर, इम्पोर्टेड झगमगीचे रंग वापरून नुसते फराटे ओढले होते त्यांना बक्षिसे मिळाली.''
एखाद्या कलाकृतीत करणाऱ्याने नावीन्य किती आणले आहे व त्याच्या कलाकृतीला शाश्वत मूल्य काय आहे, याची जाणीव सर्वांनाच असते असे नाही. स्वकष्टाने हाताने बनवलेली गोष्ट, एखाद्या गटाने खपून केलेला प्रयोग, एखाद्या देशात अंतःप्रेरणेने तयार झालेली गरिबाची कार याचे मूल्य खरोखर अमूल्यच असते. पावसाळ्याच्या दिवसांत सकाळी फिरायला जाताना एका चौकात मी अडखळलो, कारण माझ्यापुढे पाणी साठले होते व रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पहाटेचे नेहमीचे अपूर्व दृश्य म्हणजे खाली प्राजक्ताच्या फुलांचा दाट सडा पडला होता. पाणी कितपत आहे हे पाहण्यासाठी क्षणभर थांबलो, तर माझ्या मागे एक मोटरसायकलस्वार आला. त्याला वेळ नव्हता म्हणून बिनदिक्कत त्या फुलांच्या सड्यावरून त्याने मोटरसायकल क्षणात पुढे नेली. शक्य तेवढे या निसर्ग चमत्काराला दुखवू न पाहणारे माझे मन दुःखी झाले. असे असतात संस्कार आणि त्याला जपणारी मूल्ये.

शाश्वत मूल्ये...
श्रीरंग गोखले

No comments:
Post a Comment