Saturday, 25 February 2012

खरंच आभाळ कोसळतंय! आभाळ पृथ्वीच्या जवळ आले.. अंतर कमी झाले..

जंगलात झाडाचे पान अंगावर पडल्यानंतर एक ससा आभाळ कोसळलं.. आभाळ कोसळलं.. म्हणून धावत सुटतो. ससा धावत सुटतो आणि त्याच्या मागे सर्व प्राणिजगत धावते. परंतु, प्रत्यक्ष आभाळ कोसळल्याचे कुणीही पाहिलेले नसते. ही झाली बालपणीची गोष्ट; परंतु हीच गोष्ट आता प्रत्यक्षात येत आहे. होय, अगदी खरे.. कारण, पर्यावरणाच्या असमतोलाचे हे संकट प्रत्यक्ष आभाळ कोसळण्यात परिवर्तित झाले आहे. परंतु, घाबरण्याचे कारण नाही. हे आभाळ हळूहळू कोसळतेय.. न्यूझीलंडमधील अँकलँड विद्यापीठाचे रॉजर डेव्हिस यांच्या टीमने केलेल्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे. 
ढग आणि पृथ्वीतील अंतर कमी होण्याची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट नाहीत. परंतु, डेव्हिस यांच्या मते पर्यावरणाच्या र्‍हासामुळे गेली १0 वर्षे ढगांची उंची कमी कमी होत ते आता पृथ्वीच्या अधिक जवळ येत आहेत. 'नासा' या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेच्या दुर्बिणींतून ढगांची विविधांगी छायाचित्रे घेतल्यानंतर हे अंतर कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा बदल भविष्यातील संकटाची चाहूल देणारा आहे. 
२000 ते २0१0 हे संपूर्ण दशक डेव्हिस आणि त्यांच्या पथकाने ढगांच्या अभ्यासात घालवले. त्यापूर्वीच्याही प्रत्येक दशकाची माहिती गोळा केली जात आहे. त्यातून ढगांची उंची कमी होण्याची प्रक्रिया नियमित आहे की, अचानक उद्भवली हे स्पष्ट होईल, असे रॉजर डेव्हिस म्हणतात. 
--------------------------
काय आढळले अभ्यासात..?
■ गेल्या १0 वर्षांत पृथ्वीपासून ढगांची उंची एक टक्क्याने घटली. हे अंतर १00 ते १३0 फुटांचे आहे.
■ ढगांची उंची कमी होण्याचे प्रमाण अगदी वरच्या स्तरांवरील ढगांमध्येच.
■ ढग हळूहळू नियमित खाली येत असल्याचे अद्याप स्पष्ट नाही.

No comments:

Post a Comment